त्र्यंबकेश्वर – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अनेक संकटांचा सामना करुन वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घातला, तीच परंपरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित घटकांना त्यांचे न्याय हक्क देण्यासाठी अहोरात्र झटत आहे .स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता अहोरात्र संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे अशी सर्व परिस्थिती असताना काही नीच प्रवृत्तीचे लोक आपल्या संपत्तीचा माज दाखवून थेट आता आंबेडकर कुटुंबावरच गर गरळ ओकण्याचं काम करीत आहे ,परंतु अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना समाज योग्य वेळी त्यांचे जागा दाखवून देत असतो परंतु अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की ज्यावेळेस समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस फक्त आंबेडकर कुटुंबच समाजाच्या मदतीला धावून जात असते. अन्य पुढारी ? मात्र सत्तेला चिटकून बसनू समाजाकडे ढुंकूनही बघत नाही ही वस्तुस्थिती आहे.
एकमेव आंबेडकर कुटुंब त्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर ,आदरणीय आनंदराज आंबेडकर, आदरणीय सुजाता आंबेडकर हेच समाजाच्या मदतीला धावून जातात .गेल्या 40- 45 वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे समाजकारण राजकारण या क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करीत आहे गेल्या 30 वर्षापासून विदर्भामधील अकोला जिल्ह्यात आदरणीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यात अकोला जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता असतानाही सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काम करीत आहे ,अतिशय साधी राहणी व उच्च विचार हे बाळासाहेब आंबेडकर यांची कर्तुत्व आहे .बाळासाहेबांच्या गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांना प्रस्थापित राजकारण्यांकडून अनेक ऑफर आल्यात परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी या सर्व ऑफर नाकारले आहेत.
काँग्रेस पक्षाने तर त्यांना थेट राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊ केली होती परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसची राष्ट्रपतीची उमेदवारी ही नम्रपणे नाकारली होती .बाळासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं तर एका दिवसामध्ये केंद्रीय मंत्री होऊ शकतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त समाजाचा विचार केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणतात मी एका दिवसात मंत्री होऊ शकतो परंतु माझ्या समाजाचे काय ! म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमानी बाणा हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे .आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असेल किंवा आंबेडकर कुटुंब यांच्यावर संपूर्ण भारतामध्ये लोक प्रेम व जीव देतात . विरोधी पक्षातील पक्षनेते व कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर कुटुंबाचा नेहमी आदरच करतात .परंतु स्वतःला आंबेडकरी चळवळीचे म्हणून घेणारे काही नीच प्रवृत्तीचे लोक हे आपल्या स्वार्थ साठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर कुटुंबावर विनाकारण गरळ ओकतात . राजकारणात आरोप प्रत्योरोप चालतात परंतु आपण कोणावर प्रत्येकाने आपली लायकी ओळखून वागले पाहिजे . गैरमार्गाने जमविली संपत्तीचा ऐवढा माज नको.आयुष्यभर आंबेडकरांचे नाव घेऊन घेऊन आपली दुकानदारी चालवून आपले व कुंटुंबाचे पोट भरायचे .व स्वार्थ साठी आंबेडकर कुटुंबावरच गरळ ओकायची.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील सर्व शोषित, वंचित,कष्टकरी,मजूर , पीडित व 18 पगड जाती व बारा बुलेतदार यांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण चालू केलेले आहे. याच राजकारण व समाजकारणाचा धक्का घेऊन काही लोकांच्या पोटामध्ये गोळा उठला आहे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्य,वर्चस्व बांडगुळाना सहन होत नाही .त्यामुळे च आता आपल्या रोजी रोटीचे काय होईल असा प्रश्न या बांडगुळांना पडलेला आहे. त्यामुळेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकण्याचे काम केले जात आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे कुठल्याही लोभ माया याचा आपल्याला गंधही लागून दिला नाही. त्याप्रमाणेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर कुटुंब आपले संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी वाहून देत आहेत परंतु काही लोकांना हे बघवत नाही म्हणूनच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय आंबेडकर कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे .परंतु या सर्वांनी लक्षात ठेवावे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर कुटुंब आंबेडकर कुटुंबाच्या पाठीशी हा संपूर्ण भारत देश खंबीरपणे उभा आहे येणाऱ्या काळामध्ये समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
जय भीम…!
उमेशभाऊ सोनवणे तालुकाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी त्र्यंबकेश्वर