Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘विजयस्तंभ’ अभिवादनासाठी धावल्या हजारो दुचाकी !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 3, 2024
in राजकीय
0
       

रॅलीत हजारो युवक – युवतींचा सहभाग !

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन युवा आघाडीने शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे स्टेशन ते भीमा कोरेगाव अशा भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत हजारो युवक आणि युवतींनी सहभाग घेतला होता.

सुरुवातीला महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,छत्रपती संभाजी महाराज ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ,आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास राज्य कार्यकारणी मधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अभिवादन करण्यात आले. तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सूजात आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये विजय स्तंभाचा रथ बनविण्यात आला होता. पाच हजार पेक्षा अधिक दुचाकी रॅली मध्ये सामील झाल्या होत्या. त्याचबरोबर शेकडो फोर व्हीलर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व मतदार रॅली मध्ये सहभागी झाले होते. विविध मंडळांनी रॅलीच्या मार्गावरती आतिषबाजी करून त्याचबरोबर सुजात पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

सुजात आंबेडकरांच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वजण रस्त्याच्या बाजूने गर्दी करून थांबलेले होते, लोकांमध्ये रॅली संदर्भात प्रचंड उत्साह होता संपूर्ण रॅली मार्गावर हजारो बाईक स्वार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे थांबलेले होते. भिमा कोरेगाव विजयस्तंभाच्या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी रात्री 12.00 नंतर अभिवादन केले, तसेच त्यांनी उपस्थितांना संबोधित केले व त्यावेळी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता , शहरामध्ये प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये रॅली संपन्न झाली .

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे, राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, अमोल लांडगे, ॲड.अफरोज मुल्ला, विशाल गवळी, कोल्हापूर जि. निरीक्षक महाराष्ट्र देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, जि.अध्यक्ष कमलेश उकरांडे, जि.अध्यक्ष राजकुमार ,महिला जि.अध्यक्ष सीमा भालेसैन,पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी,पुणे शहर महिला शहर अध्यक्ष अनिता चव्हाण , वंचित बहुजन माथाडी शहर अध्यक्ष विशाल कसबे,पुणे शहर युवा अध्यक्ष सोमनाथ पानगावे , पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष नितीन गवळी ,शहर युवा महासचिव सुनील जावळे, पुणे शहर युवा महासचिव शुभम चव्हाण, पुणे जिल्हा पूर्व युवा अध्यक्ष मंगलदास निकाळजे ,युवा महासचिव प्रतीक चव्हाण,पुणे जिल्हा उत्तर युवा अध्यक्ष सागर गायकवाड,युवा महासचिव दीपक पंचमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, वंचित बहुजन महिला आघाडी,फुले आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल यांचीही उपस्थिती होती.

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड हे कार्यक्रमाचे संयोजक होते.


       
Tags: Bhima KoregaoMaharashtraSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !

Next Post

‘बार्टी’ चं हे चाललंय काय ?

Next Post
‘बार्टी’ चं हे चाललंय काय ?

'बार्टी' चं हे चाललंय काय ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  
article

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

by mosami kewat
October 1, 2026
0

- संजीव चांदोरकर  एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक...

Read moreDetails
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home