Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही – ॲड. आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
September 8, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही - ॲड. आंबेडकर

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही - ॲड. आंबेडकर

       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून या घटनेवर भाष्य करताना, हे राष्ट्रीय चिन्ह सर्व भारतीयांचे असून, अशा कृतींमुळे मुस्लीम समाज देशात स्वतःला वेगळं पाडत असल्याचं म्हटलं आहे. ‎तसेच ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “मी श्रीनगरमध्ये भारताचं राष्ट्रीय चिन्ह – अशोक स्तंभ – तोडल्याची तीव्र निंदा करतो. राष्ट्रीय चिन्ह हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे; ते एखाद्या व्यक्ती किंवा गटाचं नाही तर संपूर्ण राष्ट्र आणि तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं!”

‎त्याचप्रमाणे या घटनेला पाठिंबा देणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका आहे. “अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाची तोडफोड करून आणि त्याला पाठिंबा देऊन, मुस्लीम स्वतःला आणि संपूर्ण समाजाला भारतात वेगळं पाडत आहेत,” असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

‎ॲड. आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. “मुस्लिमांनी हे समजून घेतलं पाहिजे की, भारत दार-उल-अमन आहे, दार-उल-इस्लाम नाही!” या वाक्याद्वारे त्यांनी भारताची ओळख शांतताप्रिय राष्ट्र अशी आहे, धार्मिक राष्ट्र नाही, यावर भर दिला आहे.


       
Tags: Ashoka pillarJammu and KashmirmumbaiPrakash AmbedkarsrinagarVanchit Bahujan Aaghadivandalismvbafotindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अंतर्गत जिल्हा कमिटीची विभागीय दौरा उत्साहात संपन्न

Next Post

बोखारा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणी साठी मुलाखत व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न

Next Post
बोखारा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणी साठी मुलाखत व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न

बोखारा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणी साठी मुलाखत व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 
बातमी

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

by mosami kewat
March 30, 2026
0

खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे...

Read moreDetails
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

March 30, 2026
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

March 30, 2026
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

March 30, 2026
अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

March 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home