Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी, राजकीय
0
वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!
       
कर्जमाफीच्या आश्वासनावरून वंचित बहुजन आघाडीची सरकारवर टीका

अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले गावात बाबासाहेब सुभाष सरोदे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सरोदे यांनी सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी सरोदे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या सोबत नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. चव्हाण यांनी यावेळी बोलताना फडणवीस सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, “हे सरकार जनतेला केवळ आश्वासनांच्या भूलथापांमध्ये अडकवते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे बळी घेणारे खुनी सरकार आहे.”

या घटनेने वडुले गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Tags: ahmadnagarFarmerFarmersMaharashtraMaharashtra Agriculture MinisterVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानंतर गोसावी समाजाच्या मागण्यांवर प्रशासनाची तात्काळ दखल; २२ ऑगस्टला विशेष शिबिराचे आयोजन

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
बातमी

बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

by mosami kewat
April 13, 2026
0

PhD Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप...

Read moreDetails
अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

अमेरिकन निवडणुकांचे गणित आणि इराणचे निमित्त; ट्रम्प यांचा ‘डिफ्लेक्शन’ गेम!

April 13, 2026
Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 13, 2026
नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 13, 2026
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

April 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home