Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

mosami kewat by mosami kewat
June 28, 2025
in बातमी
0
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎

       

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा तीव्र इशारा दिला आहे. ‎

खासगी कंपन्यांना समांतर वीजपुरवठा परवाना देणे हे वीज मंडळाच्या खासगीकरणाची सुरुवात आहे. सरकारने हे समांतर परवाने देऊ नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने हे धोरण न बदलल्यास वंचित बहुजन आघाडी या खासगीकरण धोरणाविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‎

‎प्रकाश आंबेडकर यांनी आहे की, राज्यात समांतर वीज परवाना, स्मार्ट मीटर योजना आणि २०० कोटींवरील महापारेषणचे प्रकल्प टी.बी.सी.बी.पद्धतीने देण्याचे धोरण हे महावितरणआणि महापारेषण कंपनीच्या खासगीकरणाचाच एक भाग आहे. ‎ ‎

महावितरणनेही मुंबई शहरातील कुलाबा, माहीम, बांद्रा, दहिसर अशा एकूण १३ क्षेत्रांमध्ये वीज वितरणासाठी परवाना अर्ज दाखल केला आहे, यालाही वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‎

‎या खासगीकरण धोरणाविरोधात विद्युत क्षेत्रातील विविध कामगार संघटनांचे एकत्रित संघटन असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मंगळवारी महावितरणसह शासनाला राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या संपाला आणि आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील असे जाहीर केले. ‎ ‎

तसेच, महावितरणच्या खासगीकरणाचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने महाराष्ट्रात आंदोलन केल्यास त्यांना कायदेशीर मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये महावितरणला ‘पर्याय’ उभा करण्याचे सरकारी धोरण यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले


       
Tags: electricitygovernmentlicensesPrakash Ambedkarprivatizationprotest
Previous Post

राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‎

Next Post

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

Next Post
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी
बातमी

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

by mosami kewat
May 23, 2026
0

- राजेंद्र पातोडे बुरे दिन आने वाले है, काटकसर करा, असे सांगून विदेशात पलायन केलेले प्रधान सेवक देशात परतले. मोठा...

Read moreDetails
Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

May 23, 2026
भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

May 22, 2026
पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 21, 2026
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

May 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home