Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सहा हजार कोटी पंतप्रधानकार्यालयाने वसूल केले

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 2, 2024
in राजकीय
0
सहा हजार कोटी पंतप्रधानकार्यालयाने वसूल केले
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : उस्मानाबाद मतदारसंघात प्रचार सभा

उस्मानाबाद : साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

१९८० पासून ते २०२४ अशा काळात इंदिरा गांधी ते मोदी असे सगळे पंतप्रधान पाहिले.  यामध्ये पंतप्रधानाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय आणि लोकांना न्याय देणारे भीतीमुक्त कार्यालय असा कारभार मी पाहत आलो आहे. मागच्या 10 वर्षांत मानवतेचा कार्यकाळ राहिला नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांना भिडवण्याचे षडयंत्र येथे झाले. पण वंचित बहुजन आघाडीने शांततेची भूमिका घेतल्याने सलोखा कायम राहिला आहे. इथे एकही वर्ग नाही जो म्हणेल तो सुखाने आणि शांतीने राहत आहे. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय म्हणत होते. दर जूनमध्ये हमीभाव जाहीर करता पण हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून ते शेतकरी लाखोंच्या संख्येने हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये दिल्लीत आंदोलनाला बसले होते.

तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर भाऊसाहेब आंधळकर यांना मतदान द्या आणि स्वातंत्र्य गमवायचे असेल, तर भाजपला मतदान द्या. असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

भाजपला सत्तेतून खाली खेचा

भाजप तुम्हाला गुलाम करत आहे, लोकशाही संपवून त्यांना हुकूमशाही आणायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा तुमचा मेंदू त्यांच्या ताब्यात आहे का ? हे तपासण्याचे काम चालू आहे. त्यांना सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. असेही त्यांनी म्हटले. कल्याणकारी राज्य हवे होते, इथे वसुलीचे राज्य सुरू झाले आहे इथे कल्याणकारी राज्य पाहिजे होते, ते न राहता लोकांना त्रास देणारे वसुलीचे राज्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


       
Tags: LoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarusmanabadVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

..तेव्हा वंचित तुमच्या सोबत उभी होती!

Next Post

लोकशाहीचे सामाजिकीकरणकरणे हेच वंचितचे धोरण

Next Post
लोकशाहीचे सामाजिकीकरणकरणे हेच वंचितचे धोरण

लोकशाहीचे सामाजिकीकरणकरणे हेच वंचितचे धोरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!

by Tanvi Gurav
July 25, 2025
0

दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले...

Read moreDetails
पुण्यात वाहनांची तोडफोडीची मालिका! फुरसुंगीत मध्यरात्री दहशत; आरोपी २४ तासांत अटकेत

पुण्यात वाहनांची तोडफोडीची मालिका! फुरसुंगीत मध्यरात्री दहशत; आरोपी २४ तासांत अटकेत

July 25, 2025
गाझामध्ये उपासमारीमुळे हाहाकार: मृतांचा आकडा वाढतोय, लहान मुले सर्वाधिक बळी

गाझामध्ये उपासमारीमुळे हाहाकार: मृतांचा आकडा वाढतोय, लहान मुले सर्वाधिक बळी

July 25, 2025
रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली

रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली

July 25, 2025
ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी 'स्वतंत्र दर्जा'; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी ‘स्वतंत्र दर्जा’; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

July 25, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home