Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

पृथ्वीराज चव्हाणांच्या उलट्या बोंबा; ‘वंचित’ चा हल्लाबोल !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 9, 2024
in राजकीय
0
पृथ्वीराज चव्हाणांच्या उलट्या बोंबा; ‘वंचित’ चा हल्लाबोल !
       

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी भडक वक्तव्य करू नयेत असा सल्ला माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता, याला उत्तर देत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, मल्लिकार्जुन खरगे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं की न घ्यावं या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना बोलावलं होतं, त्यात पृथ्वीराज चव्हाण होते. त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास विरोध केला होता. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला एक वेगळा सल्ला द्यायचा की वंचितला सोबत घेऊ नका, आणि बाहेर येऊन माध्यमांमध्ये वंचितला वेगळे सल्ले जायचे, सारवासारव करणारी भूमिका मांडायची या भूमिकेचे वागण्याचा नेमकं कारण काय आहे? पृथ्वीराज चव्हाण यांना मी सांगू इच्छितो की याला मराठीत म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा, तशी तुमची अवस्था आहे.

अनेकदा माध्यमांमधून, समाज माध्यमांमधून आणि सभांमधून आम्हाला इंडिया आघाडी मध्ये सहभागी व्हायचंय याची जाहीर वाच्यता केलेली आहे, सगळ्या जगाला हे माहिती आहे. मात्र तरीही अद्याप आम्हाला तुमच्या पक्षाकडून किंवा इंडिया अलायन्स कडून कुठलंही अधिकृत निमंत्रण न आल्यामुळे आम्ही त्याचा भाग होऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एकीकडे विरोध करायचा आतून आणि बाहेर येऊन वेगळच काहीतरी सांगायचं त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी या अशा पद्धतीच्या उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं आणि सरळ सोयीने काही जर चांगलं जुळून येत असेल, तर त्याला सहकार्य करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वारंवार माध्यमांच्यामार्फत समोर आले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर हे देखील आपल्या सभा आणि भाषणांमध्ये यावर स्पष्ट भूमिका जाहिरपणे मांडत आहेत. मात्र, महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटात चाललंय काय ? असा सवाल आता जनतेला पडत आहे. अशात आपल्याच पक्षा विरोधात बंड करणारे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस श्रेष्ठींची आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचे बोलले जातंय.


       
Tags: CongressPrakash Ambedkarpruthviraj chavhanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

तलाठी भरती परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी ‘वंचित’ मैदानात !

Next Post

वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर

Next Post
वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर

वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे - रेखा ठाकूर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

by mosami kewat
August 12, 2026
0

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी...

Read moreDetails
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home