Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडी नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक विश्रामगृह अकोला येथे संपन्न.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 16, 2022
in बातमी
0
वंचित बहुजन युवा आघाडी नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक विश्रामगृह अकोला येथे  संपन्न.
       

वंचित बहुजन युवा आघाडीची नवनियुक्त शहर तथा तालुका कार्यकारिणी ची बैठक प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा तथा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामगृह अकोला येथे संपन्न

अकोला दि.१५- वंचित बहुजन युवा आघाडी अकोला शहर तथा तालुका 9नवनियुक्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अकोला येथील विश्रामगृह येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा तथा प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती ताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ वानखडे, समाज कल्याण सभापती आकाश भाऊ शिरसाठ जि प सदस्य रामाभाऊ गव्हाणकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले व त्याचप्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी यांना पक्ष संघटन बळकट करून पक्षाचे विचार तथा बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे जे धोरण आहेत की शेकडो वर्षापासून सत्तेतून वंचित असलेला समूह अशा समूहाला सत्तेची दार उघडी करून देण्याचे जे धोरण आहे या धोरणाची माहिती तथा पक्षाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे आणि वेळप्रसंगी समाजातील लोकांच्या मदतीला वंचित बहुजन युवा आघाडीचे सैनिक म्हणून धावून जावे असे सांगितल.

या बैठकीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी वंचित बहुजन युवा आघाडी नवनियुक्त विविध कार्यकारणी मध्ये कशाप्रकारे सर्व समाजातील युवकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी ही पक्षाच्या वतीने देण्यात आली हे प्रदेशाध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिले.

या बैठकीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढील नवनियुक्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अकोला पूर्व:- जयभाऊ तायडे(अध्यक्ष), आशिष गिरी,(महासचिव),सतीश यादव(संघटक)

अकोला पश्चिम:- आशिषभाऊ मांगुळकर (अध्यक्ष),कुणालभाऊ राऊत (महासचिव),

बार्शीटाकळी तालुका:- अमोलभाऊ जामनिक(अध्यक्ष), अक्षय राठोड (महासचिव)कृष्णा पाटील (संघटक) निलेश खंडारे (कोषाध्यक्ष)

तेल्हारा तालुका:- जिया शहा (अध्यक्ष)अनंत इंगळे( संघटक)

अकोट तालुका:- मयूर सपकाळ (अध्यक्ष) निशांत राठोड( महासचिव) नंदकिशोर मापारी (कोषाध्यक्ष)

बाळापुर तालुका:- संदीप भाऊ वानखडे (अध्यक्ष)सचिन रोहनकर (महासचिव)

या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुका तथा शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश महासचिव यांचा सत्कार केला या बैठकीचे सूत्रसंचालन अकोला पश्चिमचे युवा आघाडीचे महासचिव कुणाल भाऊ राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अकोला पूर्वचे युवा आघाडीचे अध्यक्ष जय भाऊ तायडे यांनी केले.


       
Tags: AkolaVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा !

Next Post

मुख्यमंत्री आणि एका मंत्र्याचे मंत्रिमंडळ घटनाबाह्य ! – राजेंद्र पातोडे

Next Post
मुख्यमंत्री आणि एका मंत्र्याचे मंत्रिमंडळ घटनाबाह्य ! – राजेंद्र पातोडे

मुख्यमंत्री आणि एका मंत्र्याचे मंत्रिमंडळ घटनाबाह्य ! - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
बातमी

बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

by mosami kewat
November 12, 2025
0

नाशिक : बाळासाहेब आंबेडकर यांच्या तत्वनिष्ठ राजकारणावर विश्वास ठेवत नाशिक जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत आज भव्य पक्षप्रवेश झाला....

Read moreDetails
शंभर वर्षांच्या देशी परंपरेवर परकीय कॉर्पोरेटचा कब्जा

शंभर वर्षांच्या देशी परंपरेवर परकीय कॉर्पोरेटचा कब्जा

November 12, 2025
डिजिटल मक्तेदारीचा धोका: बिग डेटा कंपन्यांच्या नियंत्रणाखाली मानवी विचारशक्ती!

डिजिटल मक्तेदारीचा धोका: बिग डेटा कंपन्यांच्या नियंत्रणाखाली मानवी विचारशक्ती!

November 12, 2025
IKEA निमित्ताने: तोटा सहन करण्याची ताकद फक्त कॉर्पोरेटलाच का?

IKEA निमित्ताने: तोटा सहन करण्याची ताकद फक्त कॉर्पोरेटलाच का?

November 12, 2025
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी, मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी, मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

November 12, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home