Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
October 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
       

औरंगाबाद : सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेत कमेंट करण्यात आले.  याबाबत पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या गंभीर घटनेप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले.

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानुसार, सुजात आंबेडकर यांनी ‘जय भीम Gen-Z’ या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना शहरांच्या नामकरणासंदर्भात आपले मत व्यक्त केले होते. या विधानाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना फर्दापूर येथे पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या शंकर मडपे आणि याच ठिकाणी गृहरक्षक दलात कार्यरत असलेल्या यश काकडे यांनी फेसबुकवर सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘cops_shankarkumar_sk’ या फेसबुक अकाउंटवरून कमेंट करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने सुजात आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद स्वरूपाची टिप्पणी केली. तसेच ‘yash_kakde_patil_’ या फेसबुक अकाउंटवरून गृहरक्षक दलातील कर्मचारी यश काकडे यांनीही अश्लील व अवमानकारक भाषा वापरून टिप्पणी केल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे.

दरम्यान, पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून सोशल मीडियावर राजकीय नेत्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे गंभीर बाब असल्याचे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर तसेच विभागीय कारवाई करावी आणि दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सूर्यकांत कोकणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. तसेच चार दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी सादर करताना नगरसेवक अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, युवा पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान, महिला आघाडी शहराध्यक्षा वंदना जाधव, जिल्हा महासचिव रामदास वाघमारे, जिल्हा महासचिव प्रविण हिवाळे, जिल्हा सचिव मुक्तार सय्यद, शहर महासचिव भगवान खिल्लारे, जिल्हा संघटक राजन किर्तने, सिल्लोड तालुकाध्यक्ष बनेखॉ पठाण, जिल्हा सहसचिव अशोक खिल्लारे, जिल्हा महासचिव इजि. इकबाल, सूरज मुळे, मुंजा तुपसैदर, शहर महासचिव आनंद शेजूळ, संदीप पगारे, कुणाल गायकवाड, सोयगाव तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, मनोहर जगताप, दीपक औचार, रवि रत्नपारखे, रंजित जगताप, वैशाली राणेकर, मंगल देहेरे, जया गजभिये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: aurangabadjai bhim gen zMaharashtraPoliticalsocial mediaSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

तरुणांचा राग रस्त्यावर का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बातमी

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

by mosami kewat
October 3, 2026
0

औरंगाबाद : सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेत...

Read moreDetails
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026
पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

October 3, 2026
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

October 3, 2026
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home