पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण आणि कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी (1 ऑक्टोबर) पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेल्या संवादाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार आणि MPSC परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असताना हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार आणि विद्यार्थ्यांमधील संवादादरम्यान एका विद्यार्थ्याने पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर हल्ला झाला. यावेळी त्यांना कानशिलात लगावण्यासह धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आले.
या घटनेची माहिती पीडित पत्रकाराने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्या नंतर आंबेडकरांनी पुणे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्याशी फोनवरून संपर्क साधून कारवाईची सूचना केली. पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधातील FIR मध्ये पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आवश्यक कलमांचा समावेश करावा, अशीही सूचना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावरील हल्ल्याबाबत माफी मागेपर्यंत पुण्यातील त्यांच्या कार्यक्रमांचे वार्तांकन न करण्याचा निर्णय उपस्थित पत्रकारांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.






