मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी आंदोलनस्थळी जाऊन साहिलच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीनंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ‘एक्स’ खात्यावर पोस्ट केले आहे. पोस्ट मध्ये ते म्हणाले की,
साहिल अत्यंत हुशार विद्यार्थी होता, हे त्याच्या मागच्या परीक्षेतील रेकॉर्डवरून समजते. वकिलांशी सुद्धा यावेळी केसच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली. ह्या प्रकरणातील पोलिसांचा तपास हा निराशाजनक आहे.
ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना अजून चौकशीला बोलावले नाही, कोर्टासमोर आणले नाही.
पुढे ते म्हणाले की, अशा संवेदनशील प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या हात आहे का? हे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याशिवाय पोलीस असा तपास करत नाहीत.
असे देखील ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.





