Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. या जनआंदोलनाला मुस्लिम धर्मगुरू मौलाना मजर अब्बास, मुस्तफा फारुख, मौलाना नुरी सय्यद,  सय्यद फैजान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, युवा नेते सुजात आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, माजी आमदार नतिकुद्दीन खतीब, फारुख अहमद, तैययब जफर, ऍड. सुजाता वालदेकर,  ऍड. अरुण जाधव, जितरत्न पटाईत, प्रशांत इंगोले, उत्तम वनशिवे, कृष्णा देशमुख, डॉ. चित्रा कुऱ्हे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत गंभीर इशारा देत येणाऱ्या संकटांकडेही लक्ष वेधले. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मागील मार्च महिन्यातच केंद्र सरकारला आर्थिक परिस्थितीबाबत इशारा दिला होता. सरकारने आर्थिकदृष्ट्या स्वतःला सावरले नाही, तर काही महिन्यांत परिस्थिती बेकाबू होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. महागाईमुळे लोकांच्या पोटातील आग आणखी भडकत चालली आहे. ज्या दिवशी महागाईची ही आग डोक्यापर्यंत पोहोचेल, त्या दिवशी डोक्यापर्यंत पोहोचलेली ही आग पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही. 

पोलिसांनाही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले. “गुलामी करणे सोडा. परिस्थिती येताना दिसत आहे. कदाचित तुम्हाला ती दिसत नसेल, पण आम्हाला ती जाणवत आहे,” असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इस्रायलसोबतच्या भारताच्या संबंधांवरही त्यांनी भाष्य केले. आरएसएसच्या ऐतिहासिक भूमिकेचा संदर्भ देत त्यांनी संघाच्या इस्रायलसोबतच्या मैत्रीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. इस्रायल आणि भारताच्या संबंधांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रहिताचा विचार करून भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, भारताने जगातील मित्रराष्ट्रांशी संबंध अधिक मजबूत करण्याची गरज आहे. चीनचे वाढते आर्थिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन भारताने जागतिक घडामोडींकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

आंबेडकरांनी देशाच्या अर्थव्यवस्थे बाबतही चिंता व्यक्त केली. ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांनी ते बँकेत ठेवले असतील, तर ताबडतोब बँकेतून पैसे काढा. ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील, हे लक्षात ठेवा असे देखील सांगितले.

भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन राखून जगातील विविध देशांशी संबंध मजबूत करण्याची गरज असल्याचे आंबेडकर म्हणाले. विशेषतः इराणसारख्या देशांसोबतचे संबंध कायम ठेवणे भारताच्या हिताचे असल्याचे म्हणाले.

“आम्ही सरकारला एवढीच मागणी करतो की, खाडी युद्ध सुरू असेपर्यंत भारताने इस्रायलला एकही शस्त्र विकू नये. इस्रायलला शस्त्र विकणे म्हणजे इराणविरोधातील युद्धाला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासारखे आहे,” अशी भूमिका आंबेडकरांनी मांडली.

भारताची जहाजे आणि शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीबाबतही ते बोलले. भारताने कोणत्याही दबावाखाली न जाता देशाच्या हिताला प्राधान्य देऊन परराष्ट्र धोरण ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील या जनआंदोलनातून वंचित बहुजन आघाडीने भारत-इराण संबंध, इस्रायलला शस्त्रविक्री, वाढती महागाई, आर्थिक परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत आपली भूमिका मांडली.

या जनआंदोलनाला मुंबईसह विविध भागांतून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हातात भारताचा तिरंगा घेऊन नागरिकांनी सरकारच्या भूमिकेविरोधात आक्रोश व्यक्त केला. ‘भारत इराणसोबत आहे’ आणि भारताने इराणची साथ द्यावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांसह युवक तसेच विविध समाजघटकांतील नागरिकांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. भारत-इराण संबंधांबाबत केंद्र सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.


       
Tags: Anjalitai AmbedkarCSMTIranMaharashtramumbaiMumbai Jan Andolannarendra modiPoliticalPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 1, 2026
0

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन...

Read moreDetails
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home