मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ‘जनआंदोलन’ करण्यात आले. दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती.
या जनआंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी ‘भारत इराणसोबत आहे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.





