औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेची स्थापना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, गंगापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिग, जिल्हा सचिव संदीप जाधव, अमृतराव डोंगरदिवे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शाखाध्यक्षपदी विशाल वाकळे, उपाध्यक्षपदी तेजस रंजवे, सचिवपदी महादेव गिरी, सहसचिवपदी नागेश दोडके, तर कोषाध्यक्षपदी जीवन त्रिभुवन यांची नियुक्ती करण्यात आली.
सल्लागार म्हणून अनिकेत खिल्लार, सचिन म्हस्के, शाम पाखरे, प्रकाश साबळे, उद्धव रंजवे, विजय त्रिभुवन, राजरतन इंगोले, रविंद्र त्रिभुवन, बाळासाहेब त्रिभुवन, अमोल खडसे, फिरोज पठाण, सिधोधन वाघमारे, राजू खिल्लारे, सिंगारे, गणेश, गणेश मोरे, यशवंत पठाडे आणि राहुल वाहुळ यांची निवड करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून विकास रंजवे, प्रणव खिल्लारे, हर्षल त्रिभुवन, संदीप वाघमारे, गौतम पांनाड, राजरत्न पठारे, बाळू ढेंब्रे, शेषराव नेथने, विकी नारवाडे, दानिश शेख, अल्ताफ सय्यद, विशाल रंजवे, संभाजी सावते, अरविंद खडसे आणि विशाल खडसे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला.
शाखा स्थापनेच्या कार्यक्रमाला महिला व पुरुष कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या शाखेच्या माध्यमातून परिसरात संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.





