Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

mosami kewat by mosami kewat
September 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
       
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करणार आहेत.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगली मेस सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, बंद करण्यात आलेले अभ्यासक्रम पुन्हा सुरू करणे तसेच दहा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या आहेत. या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.  दलित-बहुजन समाजातील सहा विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांना विद्यापीठात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (Adhikar Bachav Morcha)

या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर रोजी वर्धा येथे आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेणे, प्रवेशबंदीचा निर्णय रद्द करणे आणि विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या पूर्ण करणे यासाठी विद्यापीठ प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्यानचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सुजात आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आता विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून थेट उत्तर मागण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. (Adhikar Bachav Morcha)

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ हा २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, आर्वी नाका येथून सुरू होऊन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, छत्रपती शिवाजी गेट, त्रिमूर्ती नगर, वर्धा येथे पोहोचणार आहे.

Tags: Adhikar Bachav MorchacollageEducationMaharashtraPoliticalstudentSujat AmbedkarVardha
Previous Post

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
बातमी

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

by mosami kewat
September 27, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८...

Read moreDetails
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home