Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी
       

प्रा. डुल्ला यांना तत्काळ अटक करा; जातीय भेदभाव व मानसिक छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित युवा आघाडीची मागणी

चंद्रपूर : आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध CBI चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले जातीय भेदभाव, अपमान व मानसिक छळाचे आरोप, तसेच परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि त्यांच्या चारित्र्याबाबत प्रसारित झालेल्या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. उपलब्ध पुरावे, संबंधितांचे जबाब आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात आली.

आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच चुकीची अथवा खोटी माहिती प्रसारित झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली. प्रा. सूर्यकुमार डुल्ला यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्यास, त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी. आयआयटीसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये SC, ST आणि OBC प्रवर्गातील प्राध्यापकांची आरक्षणानुसार प्रलंबित भरती पूर्ण करावी. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना संविधानिक मूल्ये, समानता व विद्यार्थी अधिकारांबाबत प्रशिक्षण द्यावे. तसेच जातीय भेदभावाच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्पष्ट SOP लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.

“चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. कोणालाही संस्थात्मक संरक्षण मिळता कामा नये,” अशी भूमिका वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशी, आरोपांची स्वतंत्र चौकशी आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाईबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास चंद्रपुरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडीने दिला. आंदोलनाची पुढील दिशा प्रशासनाच्या भूमिकेनुसार निश्चित करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वंचित युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले, सिद्धांत पुणेकर, हर्षवर्धन कोठारकर, अभिलाष चुनारकर, नकुल कांबळे, प्रतीक वाघमारे, सुदेश शिंगाडे, प्रजय देवगडे, कुणाल उराडे, आनंद वासनिक, अजय उराडे, अविनाश वाळके, श्रुती दुर्गे, सिद्धार्थ भैसारे, राकेश पेटकर, राहुल गौरकार, डॉ. प्रज्ञाशील सहारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकार, महिला आघाडी महानगराध्यक्ष तनुजाताई रायपुरे, मोनाली पाटील, अनिता खरतड, पुष्पा कोटांगले, दिलीप मेश्राम यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: chandrapurIITIIT BombayMaharashtraPoliticalSamyak Students MovementVanchit Bahujan Aghadi
Previous Post

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी
बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

by mosami kewat
September 27, 2026
0

प्रा. डुल्ला यांना तत्काळ अटक करा; जातीय भेदभाव व मानसिक छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित युवा...

Read moreDetails
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

September 27, 2026
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home