Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
September 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षाचे संघटन, आगामी ध्येय-धोरणे तसेच पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्षांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीचा सन्मान व ओळख समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील पक्षाची पुढील वाटचाल, संघटनात्मक विस्तार आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले.

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राज्य कमिटी सदस्य सुजात आंबेडकर, दीपक डोके, डॉ. चित्रा कुरहे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात आणि उत्तम वनशिव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीची संघटन बांधणी अधिक मजबूत करणे आणि पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे, हे आगामी काळातील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई यांच्यासह मुंबई कार्यकारिणीचे पदाधिकारी, नवनिर्वाचित वॉर्ड अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtramumbaiPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

Next Post

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली
क्रीडा

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

by mosami kewat
September 23, 2026
0

Mirabai Chanu Asian Games Silver Medal: ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर...

Read moreDetails
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

September 22, 2026
वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

September 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home