Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

mosami kewat by mosami kewat
September 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!
       

मुंबईत १ ऑक्टोबरला ‘आम्ही भारतीय इराणच्या सोबत आंदोलन ॲड. प्रकाश आंबेडकर

नागपूर : देशभरात विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून विरोधी पक्ष कोमात गेल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांवर आपल्या प्रदेशातील प्रश्नांसोबतच राष्ट्रीय प्रश्नही उपस्थित करण्याची जबाबदारी आली आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २२ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर येथील रवी भवन, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, महागाई आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सध्या आखाती भागात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊ शकतो. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थसंकल्पावर होईल. युद्ध अधिक काळ सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

धर्म आणि जातीच्या चौकटीपलीकडे जाऊन देशासमोरील सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे पाहण्याची गरज असल्याचेही आंबेडकर यांनी नमूद केले. महात्मा गांधी, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म नाकारला नाही; मात्र सामाजिक जीवनाचे महत्त्वही अधोरेखित केले. महागाई हा सामाजिक जीवनातील महत्त्वाचा प्रश्न असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ॲड. आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या इस्रायलविषयक भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. भारताच्या आर्थिक हितासाठी स्वस्त दरात कच्चे तेल उपलब्ध करून घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आणि रशियाकडून तुलनेने कमी किमतीत कच्चे तेल उपलब्ध होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्रायलला शस्त्रास्त्रे देऊ नयेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. इस्रायलकडून भारताने शस्त्रे खरेदी करायची असतील तर खुशाल करावीत; मात्र भारताने इस्रायलला शस्त्रे विकू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. भारताच्या कठीण प्रसंगी इराणने भारताला पाठिंबा दिल्याचा दावा करत, सध्याच्या परिस्थितीत भारताने इराणच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. काश्मीरच्या प्रश्नासह विविध प्रसंगी इराणने भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

१ ऑक्टोबरला मुंबईत ‘आम्ही इराणबरोबर आहोत’ आंदोलन ―

१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हीटी) येथे ‘आम्ही भारतीय इराणबरोबर आहोत’ या भूमिकेसह आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी भारतीय नागरिकांना केले.

देशाच्या सार्वभौमत्वासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगत आंबेडकर म्हणाले की, देशासमोरील प्रश्नांकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची आवश्यकता आहे. केवळ धर्म आणि जात यांच्या चौकटीत अडकून न राहता महागाई, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि देशाच्या सार्वभौमत्वासारख्या प्रश्नांवर नागरिकांनी विचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भारताच्या आर्थिक आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारे धोरण सरकारने स्वीकारावे, अशी मागणी करत त्यांनी १ ऑक्टोबरच्या मुंबईतील कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.


       
Tags: MaharashtramumbaiMumbai protestnagpurPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!
बातमी

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

by mosami kewat
September 22, 2026
0

मुंबईत १ ऑक्टोबरला 'आम्ही भारतीय इराणच्या सोबत आंदोलन ॲड. प्रकाश आंबेडकर नागपूर : देशभरात विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत नाही....

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

September 22, 2026
‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बैठक; अंजलीताई आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

September 22, 2026
भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध

भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध

September 22, 2026
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home