हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीच्या वतीने जिल्हा परिषद पोत्रा सर्कल अंतर्गत येणाऱ्या पावनमारी गावाला भेट देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विविध समस्या, स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका महासचिव प्रियानंद घोडगे, उपाध्यक्ष यशवंत काका नरवाडे, सचिव मुकिंदा ढेपे, सचिव देविदास नरवाडे आणि शुभम नरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान पावनमारी तसेच बोथी गणातील अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी गावातील विविध समस्या व स्थानिक मुद्दे पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.





