Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
August 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा
       
नांदेड : ५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक २६ नुसार विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (Stenographer) हे पद मृत करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लघुलेखक पदासाठी तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या संधींवर मोठा परिणाम झाला आहे.

लघुलेखक पद पुनर्जीवित करण्यात यावे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या १०० टक्के रिक्त जागांची तातडीने पदभरती करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी गेल्या सहा दिवसांपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

या विद्यार्थी आंदोलनाला ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्याने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

शासनाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे तत्काळ निराकरण करावे, तसेच लघुलेखक पद पुनर्जीवित करून विविध शासकीय विभागांमधील १०० टक्के रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला वंचित बहुजन युवा आघाडीचा पूर्ण आणि ठाम पाठिंबा असल्याचे पत्र प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांच्या वतीने उपस्थित उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी श्याम कांबळे, युवा दक्षिण महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक आणि महासचिव शुद्धोधन कापसीकर यांची उपस्थिती होती.

Tags: EducationNanded Students ProteststudentVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home