Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

mosami kewat by mosami kewat
August 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
       
जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून, जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून हिवाळे यांची बदनामी केल्याप्रकरणी २१ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांनी ३० ऑगस्ट रोजी नूतन वसाहत, जालना येथे हिवाळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पीडित कुटुंबीयांची विचारपूस केली. वंचित बहुजन आघाडी पीडित हिवाळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असून, बजरंग दलाच्या संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असे डोके यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बजरंग दलाच्या संबंधित कार्यकर्त्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी दिपक डोके यांनी जालना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी संबंधित आरोपींना दोन दिवसांत अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी कळविल्याची माहिती डोके यांनी दिली.

जातीय अत्याचाराच्या प्रकरणात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संघर्ष करणार असल्याचेही डोके यांनी सांगितले. यावेळी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाखरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुरज सोनवणे, विलास भिंगारे आदी उपस्थित होते.

Tags: Bajarang dalMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home