Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

mosami kewat by mosami kewat
August 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन
       
ससून रुग्णालयात दोन वेळा शस्त्रक्रिया; दोषी डॉक्टरांवर BNS कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुणे : बीड येथील सामान्य रुग्णालयात प्रसूतीनंतर झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे २० वर्षीय संध्या गायकवाड यांच्या पोटात हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन राहिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्या गायकवाड यांची बीड येथील सामान्य रुग्णालयात प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटात हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन राहिल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर त्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागल्याने सोनोग्राफी करण्यात आली. या तपासणीत पोटात हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

यानंतर संध्या यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील हॅन्ड ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन काढले. मात्र, त्यानंतरही आतड्यांना संसर्ग झाल्याने त्यांना त्रास होत होता. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून आतड्यांवरील उपचार केले.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीने बीड येथील सामान्य रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय उपचारादरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

दरम्यान, संध्या गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या शिष्टमंडळाने ससून रुग्णालयात भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, युवक आघाडीचे प्रदेश सदस्य विशाल गवळी, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड, हडपसर विधानसभा अध्यक्ष सचिन भडकवाड, महिला आघाडी अध्यक्षा कोमल शेलार, पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख जितेश सरोदे, सोमनाथ लोंढे, श्यामभाऊ देढे, रितेश गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि संध्या गायकवाड यांना योग्य उपचार व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Tags: HealthhospitalMaharashtrapuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

Next Post

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

Next Post
अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!
बातमी

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

by mosami kewat
August 29, 2026
0

मुंबई : मुंबई मध्ये राहुल नगर क्रमांक २, पाईपलाईन, प्रियदर्शिनी, चुनाभट्टी, सायन, येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या...

Read moreDetails
बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

August 29, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

August 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

August 29, 2026
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

August 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home