Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

mosami kewat by mosami kewat
August 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार
       
मनमाड : मनमाड बसस्थानक हे परिसरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, बसस्थानक परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत होते. तसेच चालक, वाहक आणि आगारातील कर्मचाऱ्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडी, मनमाडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) मनमाड आगार प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तसेच वॉटर कूलर अथवा फिल्टर बसवावा आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी दिला होता.

वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीची आगार प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, मनमाड आगार व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिले आहे. बसस्थानक तसेच आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी लवकरच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येईल, असे प्रशासनाने लेखी स्वरूपात कळवले आहे.

आगार प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, प्रवाशांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, जिल्हा सचिव कादिर शेख, शहर उपाध्यक्ष निलेश निकम, शहर महासचिव अमोल केदारे, शहर संघटक सुनील बागुल, रुपेश जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Drinking waterMaharashtraManmadVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

Next Post

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

Next Post
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन
बातमी

बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

by mosami kewat
August 29, 2026
0

ससून रुग्णालयात दोन वेळा शस्त्रक्रिया; दोषी डॉक्टरांवर BNS कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी पुणे :...

Read moreDetails
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !

August 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार

August 29, 2026
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

August 29, 2026
ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

August 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home