Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

mosami kewat by mosami kewat
August 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती
       
कळमनुरी : थोर समाजसुधारक, साहित्यिक आणि फकिरांचे जनक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, कळमनुरी तालुक्यातील आडा ग्रामपंचायतीला मात्र या महापुरुषाच्या जयंतीचा चक्क विसर पडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीला कुलूप असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका सचिव मुकिंदा ढेपे यांनी पुढाकार घेत हे कुलूप उघडून ग्रामपंचायत कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली.

प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड –

१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरी केली जाते. सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि ग्रामपंचायतींमध्ये महापुरुषांना अभिवादन करण्याचा शासकीय नियम आहे. मात्र, आडा ग्रामपंचायतीचे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत कार्यालयाला कुलूप लावून ठेवले होते. महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशीच ग्रामपंचायतीचा हा भोंगळ कारभार आणि अनास्था पाहून परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका सचिव मुकिंदा ढेपे यांनी तात्काळ आडा ग्रामपंचायत गाठली. बंद असलेली ग्रामपंचायत पाहून त्यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा तीव्र निषेध नोंदवला.

यानंतर त्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून कार्यालयात प्रवेश केला. तेथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून त्यांनी जयंती साजरी केली. यावेळी सोनाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य दादाराव शिंदे व अरविंद शिंदे, धम्मपाल ढेपे आदी उपस्थित होते.

Tags: Annabhau Sathe JayantiMaharashtraPolitical
Previous Post

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

Next Post

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!
बातमी

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

October 2, 2026
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home