Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

mosami kewat by mosami kewat
July 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 
       
अकोला: वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी निवडणुक गुरुवार, ३० जुलै रोजी पार पडली. अकोला शहरातील अशोक वाटिका येथील मतदान केंद्रावर पक्षाच्या जिल्ह्यातील सभासद मतदारांनी मतदान करीत, सहभाग नोंदविला. निवडणूक अधिकारी मिलिंद इंगळे आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय चोख आणि शिस्तबद्ध पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष आणि १२ कार्यकारिणी सदस्य पदांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान घेण्यात आले. अकोला येथे सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अतिशय उत्साहात मतपत्रिकांद्वारे पक्षाच्या सभासद मतदारांनी पहिल्याच मतदानाचा हक्क बजावला.

अकोला जिल्हा एकूण मतदार ३०१४ होते. त्यामधून काल १४६० मतदारांनी मतदान केले. ही मतदानाची आकडेवारी ४८.४४% एवढी राहिली. अशोक वाटिका येथील मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी ‘वंचित’च्या जिल्ह्यातील सभासद कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. वंचित कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाऊस ह्यामुळे काही काळ गोंधळ झालं. पण निवडणूक हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांनी तो आटोक्यात आणला. प्रथमच मतदानातून प्रदेश कार्यकारणी येणार असल्याने प्रचंड आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि इंजि धिरज इंगळे (सहाय्यक अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी), प्रदीप चौरे (सहाय्यक अकोला जिल्हा निवडणूक), निलेश वाहुरवाघ, डॉ अशोक मेश्राम, रोशन फुंडकर, युवराज डोंगरे, चंद्रकांत तायडे, राजकुमार वाघ, राजेश वानखडे, निलेश झाडे, वाशिम भाई, मिलिंद आकोडे, विवेक काकड, अक्षय डोंगरे ह्यांनी कामकाज पाहिले. समता सैनिक दलाने संपूर्ण परिसर मध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. आता २ तारखेच्या मत मोजणी कडे संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: ElectionMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना
बातमी

पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण आणि कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी (1 ऑक्टोबर) पुण्यात ...

Read moreDetails
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

October 3, 2026
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

October 2, 2026
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home