नांदेड : शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे नागरिकांच्या सोयीसाठी वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक राजेश पुरी सर यांना पाणी फिल्टर भेट देण्यात आले.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा महासचिव ईश्वर मामा सावंत, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आतिश ढगे तसेच रॅपर विद्रोही पाटील इंजि अक्षय जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजकारण म्हणजे केवळ प्रश्न मांडणे नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे सकारात्मक उपक्रमही राबवणे होय. पोलीस कर्मचारी आणि पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.




