Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने

mosami kewat by mosami kewat
July 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने
       
गोंदिया : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून केंद्र सरकारच्या कथित विद्यार्थीविरोधी धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच भारताच्या राष्ट्रपतींना उद्देशून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग नोंदविला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मिलिंद गणवीर, हौसलाल राहंगडाले, रामचंद्र पाटील, अरुणा गणवीर तसेच आयटकतर्फे विनोद शाहरे, महेंद्र कटरे, देवेंद्र मेश्राम आणि सुरेश रंगारी उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, मिलन गजभिये, अनिल मेश्राम, सुरेंद्रकुमार खोबरागडे, बी. जी. वासनिक, भीमराव भावे, भीमराव बन्सोड, राजेश मेश्राम, दिनेश गेडाम, अमित भालेराव, मुकेश माने आणि महेंद्र टेंभेकर यांनी सहभाग घेतला.

वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा. सतीश बन्सोड, राजू राहुलकर, नरेंद्र बोरकर, प्रकाश वासनिक, प्रफुल लांजेवार, प्रकाश डोंगरे, मंगलदास वंजारी, राजेंद्र बन्सोड, देवदास डाहट, रूपदास मेश्राम, अंकुश रामटेके, हेमंत बडोले, वामन मेश्राम, वासुदेव कठाणे, सेवकदास मेश्राम, मनोहर बडगे, शुभम मेश्राम, सिद्धार्थ हुमणे, हुमेंद्र कठरे, तुलाराम वैद्य, चिकू राहुलकर, आनंद राहुलकर, अनिल डोंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

Tags: CommunistgondiyaMaharashtra BandhPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

Next Post

संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post
संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग

by mosami kewat
July 23, 2026
0

तुळजापूर : वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तुळजापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर...

Read moreDetails
विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

July 23, 2026
संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग

July 23, 2026
गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने

गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने

July 23, 2026
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home