Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

mosami kewat by mosami kewat
June 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निधीअभावी आणि प्रशासकीय अडचणींमुळे राज्यातील लाखो महिलांचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून हप्ते न मिळाल्याने अनेक महिलांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार महिलांची फसवणूक करत आहे का, असा सवालही काही लाभार्थी महिलांकडून केला जात आहे. (Ladki Bahin Installment Delay)

Also Read :  मार्केट कॅपचा गाजावाजा आणि विकासाच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून या योजनेसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध न झाल्याने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेला अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात आला. परिणामी एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते पूर्णपणे रखडले असून, फेब्रुवारी आणि मार्चमधील काही लाभार्थ्यांनाही पैसे मिळालेले नाहीत.

दरम्यान, राज्य सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. मात्र सुमारे 60 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या आणखी 20 लाख महिलांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण 80 लाख महिलांना योजनेतून बाहेर करण्यात आले आहे. (Ladki Bahin Installment Delay)

Also Read :विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी तब्बल 2 कोटी 31 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. 65 वर्षांपर्यंतच्या महिलांनाही योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र आता मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याने आणि पात्र लाभार्थ्यांचे हप्तेही रखडल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tags: E-KYC IssueGovernment Scheme NewsLadki Bahin DBTLadki Bahin Installment DelayLadki Bahin NewsLadki Bahin Scheme MaharashtraLadki Bahin YojanaMaharashtraMaharashtra Government SchemeMaharashtra politicsWomen Welfare Scheme
Previous Post

मार्केट कॅपचा गाजावाजा आणि विकासाच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

Next Post

कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
बातमी

मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

by mosami kewat
June 2, 2026
0

अकोला : मान्सूनचे आगमन जवळ आले असताना चितलवाडी गावातील सांडपाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने पावसाच्या...

Read moreDetails
कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

June 2, 2026
लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

June 2, 2026
मार्केट कॅपचा गाजावाजा आणि विकासाच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

मार्केट कॅपचा गाजावाजा आणि विकासाच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

June 2, 2026
विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट

विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट

June 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home