पिंपरी-चिंचवड : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Ahilyabai Holkar Jayanti)
या कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, शोभाताई धावरे, शामा जाधव, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड, नारायण मस्के, विजय गेडाम, संघटक सुनील जावळे, सचिव विष्णू सरपते, शहर सदस्य दादाराव वानखेडे, भारत कुंभारे, सतीश गायकवाड, वंचित बहुजन युवा आघाडीचे सचिव शिवाजी खडसे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक बापूसाहेब गायकवाड, बाबासाहेब वाघमारे, प्रमोद शेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Also Read : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन
यावेळी उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय स्वतः नियमावली (गाईडलाईन्स) तयार...
Read moreDetails





