औरंगाबाद : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय टॉवर, पदमपुरा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा समाजाने जपावा, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. (Ahilyadevi Holkar Jayanti)
Also Read : नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!
या प्रसंगी पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, शहर उपाध्यक्ष मेघानाद जाधव, नगरसेविका करूणा मेघानाद जाधव, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार, जिल्हा महासचिव मंगेश निकम, पश्चिम युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पारखे, मुक्तार सय्यद, रवि रत्नपारखे, इक्बाल भाई, बाबासाहेब खाडे, सचिन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Also Read : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!
औरंगाबाद : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय टॉवर, पदमपुरा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून...
Read moreDetails





