Samyak Vidyarthi Andolan : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज राज्यभर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार, National Testing Agency (NTA) आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. (Samyak Vidyarthi Andolan)
Also Read : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन
तसेच NEET-UG 2026 ची फेरपरीक्षा विनामूल्य घेण्यात यावी, Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी आणि NTA ऐवजी UPSC मार्फत NEET परीक्षा घेण्यात यावी, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे डॉ. आकाश कांबळे यांनी सांगितले की, देशातील 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण आणि कोचिंग माफियांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र कायदा लागू करावा, अशीही मागणी करण्यात आली. (Samyak Vidyarthi Andolan)
Also Read : फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड
सरकारने तात्काळ ठोस निर्णय घेतला नाही तर राज्यभर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी डॉ आकाश कांबळे, अमित नागटिळे, नितीन कांबळे, सचिन कांबळे, संग्राम कांबळे, अक्षय कांबळे, बाळासाहेब शिवशरण उपस्थित होते.
लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा
नांदेड : लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे....
Read moreDetails






