Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड

mosami kewat by mosami kewat
May 29, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड

फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड

Sports Photography : आसामच्या प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकारितेत आणखी एक मोठी झेप घेतली आहे. फीफाने आगामी 2026 फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या अधिकृत कव्हरेजसाठी त्यांची निवड केली असून, पुरुषांच्या फीफा वर्ल्ड कपचे कव्हरेज करण्याची त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय मीडिया प्रतिनिधींमध्ये निवड झालेल्या त्या भारतातील एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट ठरल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडा पत्रकारितेसह ईशान्य भारतासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

गीतिका तालुकदार यांनी यापूर्वी 2018 मधील रशिया फीफा वर्ल्ड कप, 2022 मधील कतार वर्ल्ड कप, 2019 महिला फीफा वर्ल्ड कप, 2023 महिला वर्ल्ड कप, टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक यांसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांचे यशस्वी छायाचित्रण केले आहे.
त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले अनेक क्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिले आहेत. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना गीतिका तालुकदार म्हणाल्या की, फीफा वर्ल्ड कपसारख्या ऐतिहासिक स्पर्धेसाठी पुन्हा अधिकृत मान्यता मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. क्रीडा छायाचित्रणाविषयी असलेली आवड आणि समर्पण यामुळेच हा प्रवास शक्य झाला.

Also Read : सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले ‘पेड सबस्क्रिप्शन’ प्लॅन्स

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा 2026 फीफा वर्ल्ड कप हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा वर्ल्ड कप मानला जात आहे. या स्पर्धेत तब्बल 48 देश सहभागी होणार असून, जागतिक माध्यमांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे.
गीतिका तालुकदार पुढील महिन्यात जूनमध्ये या बहुचर्चित फुटबॉल स्पर्धेच्या कव्हरेजसाठी रवाना होणार आहेत.

Tags: FIFAWorldCup2026GeetikaTalukdarIndianJournalismsportsSports PhotographyWomenInSportsMediaफीफा वर्ल्ड कप २०२६
Previous Post

माता रमाई यांना वाचल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत — डॉ. भीमराव आंबेडकर

Next Post

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

Next Post
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा 
बातमी

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा 

by mosami kewat
May 29, 2026
0

नांदेड : लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे....

Read moreDetails
NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

May 29, 2026
हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

May 29, 2026
NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

May 29, 2026
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

May 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home