Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

mosami kewat by mosami kewat
May 28, 2026
in बातमी, मनोरंजन, सामाजिक
0
"कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…" उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

"कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…" उर्दू गझलविश्वातील तेजस्वी आवाज हरपला; शायर बशीर बद्र यांचे निधन

       

Bashir Badr Passes Away : आधुनिक उर्दू गझलला नवी ओळख देणारे ज्येष्ठ शायर डॉ. बशीर बद्र यांचे आज दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून देशभरातील साहित्यप्रेमी, शायर आणि चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

दीर्घकाळापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bashir Badr Passes Away)

Also Read : दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवाध्वज; युवक काँग्रेसकडून छेडछाड, भाजपसारख काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करते ?

बशीर बद्र यांनी आपल्या साध्या, संवेदनशील आणि मनाला भिडणाऱ्या शायरीमुळे उर्दू गझलला सामान्य माणसांच्या भावविश्वाशी जोडले. प्रेम, विरह, आयुष्याचे चढ-उतार आणि मानवी नात्यांतील सूक्ष्म भावना त्यांनी आपल्या शेरांमधून अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. त्यामुळेच त्यांची गझल केवळ मुशायऱ्यांपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती लोकांच्या दैनंदिन बोलण्यातही स्थान मिळवू शकली.

1969 मध्ये त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून उर्दूमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 12 ऑगस्ट 1974 रोजी मेरठ कॉलेजच्या उर्दू विभागात व्याख्याता म्हणून त्यांनी अध्यापनाची सुरुवात केली. 1990 पर्यंत त्यांनी तेथे सेवा बजावली. अध्यापनासोबतच त्यांनी शायरीच्या क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. (Bashir Badr Passes Away)

Also Read : NEET पेपर फुटीप्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन 

विशेषतः 1974 ते 1990 हा काळ त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात त्यांच्या गझलांनी देशभरात लोकप्रियता मिळवली आणि ते आधुनिक उर्दू गझलचे एक महत्त्वाचे नाव बनले. “कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से…” आणि “उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो…” यांसारख्या त्यांच्या अनेक गझला आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.


       
Tags: Bashir BadrBashir Badr Passes AwayBhopalGhazalLegendary ShayarMadhya PradeshshayarUrdu Poetry
Previous Post

म्युन्सिपल फायनान्सचे ‘वित्तीयकरण’: नागरी विकासाचा नवा जुगार?

Next Post

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

Next Post
मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा - २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा - २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी
बातमी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

by mosami kewat
July 27, 2026
0

मुंबई : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती...

Read moreDetails
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026
युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

July 27, 2026
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

July 27, 2026
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home