Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

mosami kewat by mosami kewat
May 27, 2026
in बातमी
0
Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Byju Raveendran Case : एकेकाळी भारतातील एडटेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘बायजूस’ कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याविरोधात सिंगापूरमधून मोठी कायदेशीर कारवाई झाली आहे. सिंगापूर न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी रवींद्रन यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, त्यांना मोठा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, न्यायालयाने रवींद्रन यांनी मालमत्तेशी संबंधित अनेक आदेशांचे पालन न केल्याचे स्पष्ट केले आहे. एप्रिल २०२४ पासून त्यांनी न्यायालयीन निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत त्यांना संबंधित अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

Also Read : क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज रणधीर सिंग यांचे निधन

यासोबतच न्यायालयाने त्यांना ९० हजार सिंगापूर डॉलर्स म्हणजेच सुमारे ७०,५०० अमेरिकन डॉलर्स इतका खर्च भरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ‘Beeaar Investco Pte’ या कंपनीवरील आपली कायदेशीर मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यासही सांगितले आहे. संबंधित कंपनीकडे दुसऱ्या एका संस्थेतील समभाग असल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या उपकंपनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेमुळे उभे राहिले. या निधी संस्थेने बायजूसमध्ये गुंतवणूक केली होती. त्या काळात कंपनी आर्थिक अडचणीत सापडली होती आणि मोठ्या प्रमाणावर नोकरकपात सुरू होती.

Also Read : बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!

दरम्यान, बायजूसच्या आर्थिक घसरणीनंतर बायजू रवींद्रन यांच्याविरोधातील कायदेशीर संकट अधिक गडद होताना दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांतील गुंतवणूकदार आणि कर्जदाते त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहेत. विशेषतः अमेरिकेत १.२ अब्ज डॉलर्सच्या कर्जप्रकरणामुळे कर्जदाते नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करत आहेत.

Tags: Byju Raveendran CaseByjus Financial CrisisByjus Founder Contempt CaseByjus Legal TroubleByjus NewsSingapore Court NewsSingapore Court Verdict
Previous Post

“रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर…?” बाबासाहेबांचे माता रमाईंना भावनिक पत्र

Next Post

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस

Next Post
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचा राग? विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक
क्रीडा

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

by mosami kewat
July 27, 2026
0

Mirabai Chanu, Commonwealth Games 2026 : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी...

Read moreDetails
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

July 27, 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!

July 27, 2026
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

July 26, 2026
अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

July 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home