Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद

Akash Shelar by Akash Shelar
May 24, 2026
in बातमी
0
कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद
       
ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी दिपके कुटुंबियांच्या सोबत ठामपणे उभी

पुणे : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमक्यांमध्ये, “ज्याप्रमाणे स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी झुरळे चिरडली जातात, त्याचप्रमाणे तुझी झुरळेही चिरडली जातील,” असा गंभीर इशारा देण्यात आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांना धीर दिला आहे.

ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आज मी अभिजीत दिपके यांच्या वडिलांशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. अभिजीत आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असून त्यामुळे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आहे.” प्रकाश आंबेडकर यांनी या धमक्यांचा तीव्र निषेध नोंदवत म्हटले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक सुरक्षितता हे लोकशाहीचे मूलभूत स्तंभ आहेत. सेन्सॉरशिप आणि जिवे मारण्याच्या धमक्या या मुक्त संवाद आणि लोकशाही चर्चेला कमकुवत करणाऱ्या गोष्टी आहेत.”

तसेच, त्यांनी दिपके कुटुंबाला वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास दिला. “गरज पडल्यास आमची टीम राजकीय आणि प्रत्यक्ष पातळीवर त्यांना संरक्षण देईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोशल मीडियावरील या धमक्यांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक मतभेद आणि सामाजिक माध्यमांवरील वाढत्या द्वेषपूर्ण वातावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags: AbhijeetDipke\CJPprakashambedkarSocialMediaThreatsvanchitbahujanaghadi
Previous Post

सलीम अली सरोवर वाचवण्यासाठी पुढाकार; वंचित बहुजन आघाडीच्या जरिना कुरैशी यांची महापौरांकडे मागणी

Next Post

अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

Next Post
अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश
बातमी

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

by mosami kewat
July 25, 2026
0

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

Read moreDetails
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

July 24, 2026
येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

July 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home