Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Claude Mythos’: भारताच्या बँकिंग आणि आयटी क्षेत्रासमोर अभूतपूर्व संकट?

mosami kewat by mosami kewat
April 25, 2026
in बातमी, राजकीय, विज्ञान - तंत्रज्ञान
0
Claude Mythos’: भारताच्या बँकिंग आणि आयटी क्षेत्रासमोर अभूतपूर्व संकट?
       
– संजीव चांदोरकर 

निवांत दाणे टिपणाऱ्या कबुतरांच्या थव्यामध्ये अचानक एखाद्या मांजराने धबाककन एन्ट्री घेतली तर कबुतरे कशी फडफडाट करतील तसे काहीसे होत आहे. होणार आहे.

Anthropic या अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे नवीन प्रॉडक्ट येऊ घातले आहे. त्यांचे नाव Claude Mythos असे आहे. हे अत्यंत सामर्थ्यवान प्रॉडक्ट आहे असा दावा केला जात आहे. 

हे ए आय प्रॉडक्ट मोठ्या संस्थांच्या सॉफ्टवेअर सिस्टीम मधील, आज्ञा प्रणालीतील फटी (Bugs) आणि सुरक्षितेला कोठे कोठे धोका आहे (vulnerabilities) ते शोधून काढू शकते. 

ही संकल्पना तशी नवीन नाही. सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या कंपन्या हे काम सतत करत असतात. पण असे सामर्थ्यवान ए आय प्रॉडक्ट आले तर त्याचा जसा विधायक हेतूंसाठी उपयोग होईल तसा हॅकर्स देखील त्याचा विध्वंसक हेतूंसाठी उपयोग करू शकतात. 

Anthropic कंपनीला या धोक्याची कल्पना आहे. म्हणून त्या कंपनीने हे प्रॉडक्ट फक्त काही मोजक्या अमेरिकन कंपन्यांना टेस्टिंग साठी दिले आहे. ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल इत्यादी 

पण Claude Mythos ची एवढी दहशत तयार झाली आहे की याच विषयावर चर्चा करून पूर्वतयारी करण्यासाठी आपल्या वित्तमंत्र्यांनी रिझर्व बँक, अनेक मोठ्या बँका, नासकॉम, तंत्रज्ञान मंत्रालय….यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसापूर्वी बैठक घेतली. 

हे फक्त भारतातच नाही तर अनेक देशातील सरकारे याला नक्की कसा प्रतिसाद द्यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी आपसात चर्चा करत आहेत.

मोठ्या प्रमाणावर विदा हॅण्डल करणाऱ्या बँका, वित्त कंपन्या यांच्या अंतर्गत सिस्टिमवर कमीजास्त परिणाम होऊ शकतो तसाच तो भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या धंद्यावर देखील होऊ शकतो. 

आजच्या इकॉनॉमिक टाईम्सच्या सबंधित बातमीत म्हटले आहे “Government has flagged this threat as unprecedented”

एकाच वेळी किती आघाड्या उघडल्या गेल्या आहेत…..

Tags: AIArtificial IntelligenceClaude Mythosdigital
Previous Post

राज्यात दुहेरी हवामानाचा इशारा; कुठे उष्णतेची लाट, तर कुठे वादळी पावसाची शक्यता

Next Post

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

Next Post
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home