Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

mosami kewat by mosami kewat
April 6, 2026
in बातमी, राजकीय, संपादकीय
0
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!
       
पनवेल : मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांवरील लाचलुचपत कारवायांची मालिका सुरूच असून रविवारी आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख 37 हजार रुपये स्वीकारताना नवी मुंबईतील खारघर परिसरात अटक केली. Bribery Scandal)

गेल्या महिन्यातच नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर 13 मार्च रोजी कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक मिनाक्षी उन्हाळे यांनाही अडीच लाखांची लाच स्वीकारताना ठाणे एसीबीने अटक केली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही ताजी कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (/Bribery Scandal)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी लाड यांनी संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार खारघर येथे लाच स्वीकारण्यासाठी आलेल्या लाड यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मंत्रालयातील वाढत्या लाचलुचपत प्रकरणांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Tags: MaharashtraPoliticalनवी मुंबईमंत्रालय
Previous Post

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home