नागपूर : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नागपुरात मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी नागपूर जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक रविभवन सभागृह येथे पार पडली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संविधान चौक नागपूर येथे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवणार आहेत. (Gas Price Hike)
Also Read : श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले
या बैठकीचे अध्यक्षपद जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी भूषवले, तर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी आंदोलनाच्या रूपरेषेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रविभवन येथील या बैठकीला मंचावर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष महानंदाताई राऊत, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके, महासचिव राहुल दहिकर, मनोज सुटे, सी. सी. वासे आणि साधनाताई नितनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनाची रणनीती ठरवताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

बैठकीला जिल्हा आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी आनंद चौरे, वैभव येवले, शुभम वाहने, पवन तागडे, जय चरडे, हरिदास गवई, सुदेश धनवीज, हरीश नारनवरे, मिलिंद मेश्राम, किरण देवरे, शिशुपाल देशभ्रतार, बबन वनकर, किशोर धोटे, विजय गोंडूळे, वसंत मडके, अनिल गणवीर, अनिकेत गणवीर, मिलिंद पकिड्डे, बजरंग वानखेडे व विनोद मोहोड उपस्थित होते. (Gas Price Hike)
Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी संविधान चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.






