Financial Changes from 1 April 2026: आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. या नव्या वर्षात आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक नियम आणि बाबींमध्ये बदल झाले आहेत. चला, हे बदल सोप्या भाषेत समजून घेऊया.
ATM व्यवहार महागणार
आता ATM मधून पैसे काढताना अधिक शुल्क लागू शकते. ठराविक मर्यादेपेक्षा (5 व्यवहारांनंतर) प्रत्येक व्यवहारासाठी सुमारे 23 रुपये आकारले जातील. तसेच खात्यात कमी शिल्लक असल्यामुळे व्यवहार फेल झाल्यास सुमारे 25 रुपयांचा दंड लागू शकतो. काही बँकांनी डेबिट कार्डद्वारे दररोज पैसे काढण्याची मर्यादाही कमी केली आहे.
Also Read : Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी
पगार आणि कर प्रणालीत बदल
आतापर्यंत वापरला जाणारा ‘फॉर्म 16’ बदलून नवीन ‘फॉर्म 130’ लागू करण्यात येणार आहे. यामुळे पगार आणि कराची माहिती अधिक स्पष्ट आणि व्यवस्थित मिळेल. तसेच आयकर व्यवस्थेतही बदल होऊन मूल्यांकन वर्ष आणि मागील वर्ष यांसारख्या संज्ञा काढून टाकून ‘कर वर्ष’ ही एकच संज्ञा वापरली जाईल.
PAN कार्डसाठी कडक नियम
PAN कार्ड काढताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आता केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी पासपोर्ट किंवा दहावीची गुणपत्रिका अनिवार्य करण्यात आली आहे.
Also Read : अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक
ऑनलाइन पेमेंटसाठी आता टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, फक्त OTP पुरेसा नसेल, तर दोन वेगवेगळ्या पद्धतींनी ओळख पटवावी लागेल.
नवीन कर प्रणालीत मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असल्यास कर भरावा लागणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.
Also Read : Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक
आता प्रवासाच्या 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही. 8 ते 24 तासांदरम्यान रद्द केल्यास 50% परतावा, तर 24 ते 72 तास आधी रद्द केल्यास 25% कपात होईल.
इंधन दरांमध्ये बदलाची शक्यता
जागतिक परिस्थितीमुळे इंधनाच्या किंमतीत चढ-उतार होऊ शकतो. याचा परिणाम विमान तिकीट, वाहतूक खर्च आणि इतर सेवांवर होण्याची शक्यता आहे. घरगुती LPG, तसेच CNG, PNG इंधनाच्या किंमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम
- संजीव चांदोरकर हे नवीन वित्तवर्ष त्याच्या पाहिल्याच दिवसांपासून एकाचवेळी अनेक प्रकारच्या अनिश्चितता घेऊन येत आहे. एवढ्या की सध्याच्या काळात...
Read moreDetails






