Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

mosami kewat by mosami kewat
March 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

– राजेंद्र पातोडे

अकोला शहरातील यदुराज गॅस एजन्सी येथे सिलिंडर वितरणाच्या वेळी रांगेत उभे असताना माजी सरपंच आणि वंचितचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव शिरसाट रा. अन्वी मिर्झापूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक असून गॅस वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी व निष्काळजीपणाचे द्योतक आहे. ह्या प्रकरणात वंचित बहुजन युवा आघाडी तालुका युवा अध्यक्ष मिलिंद दामोदर यांनी खदान पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

मात्र खदान पोलिसानी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही.केवळ बयान घेऊन बोळवण केली आहे.पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी यदुराज गॅस एजन्सी मध्ये जाऊन सीसीटीव्ही फूटेज आणले आहेत! विशेष म्हणजे शंकरराव शिरसाट हे भर उन्हात रांगेत उभे होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असताना पोलिस आणि सोशल मीडियावर अनेक जण दावा करत आहेत की शंकरराव शिरसाट ह्यांचा मृत्यू हृदय विकाराने झाला आहे?

ह्या प्रकारनी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना चौकशी आदेश देऊन, या प्रकरणातील विविध बाबींची माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये संबंधित मृत व्यक्तीचे गॅस कनेक्शन होते का, त्यांनी गॅस बुकिंग केले होते का, बुकिंगनंतर संदेश प्राप्त झाला होता का, तसेच ते गॅस एजन्सीत कोणत्या कारणासाठी आले होते, याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.असे नमूद आहे.हा वराती मागून घोडे असा फार्स आहे.

यदूराज गॅस एजन्सी हे थेट गावात सिलेंडर भरलेले वाहन पाठवून वितरण करीत होते. ऑनलाइन बुकिंग शिवाय हे वितरण केले जात होते.त्यामुळे तहसीलदार ह्यांनी संपूर्ण बुकिंग प्रक्रिया तपासणे आवश्यक आहे. एजन्सी कडे आलेले एकूण सिलेंडर आणि त्याचे वितरण ह्याची चौकशी गरजेची आहे.

कारण ह्या प्रकरणात प्रचंड बाबी गंभीर स्वरूपाच्या आहेत. गॅस सिलिंडरचे होम डिलिव्हरी न करता ग्राहकांना एजन्सीसमोर रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जात होते. एजन्सीसमोर मोठी गर्दी असूनही योग्य व्यवस्थापन टोकन पद्धत नव्हती, सावलीची व्यवस्था करण्यात आले नाही. ग्राहकांच्या सुरक्षिततेकडे पूर्णत दुर्लक्ष करण्यात आले.

वेळेत वितरण न करता कृत्रिम टंचाई निर्माण केल्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आलेली दिसत नाही. शंकरराव शिरसाट ह्यांना खूप वेळ उभे ठेवून त्यांना ekyc करून घ्या असे एजन्सी कडून सांगण्यात आले होते. ३/१२/२४ रोजी त्यांचे पत्नीचे नावावर असलेल्या ह्या गॅस कनेक्शनची केवायसी झाली होती, तरी देखील त्यांना पुन्हा केवायसी का सांगितली गेली?

वरील सर्व बाबी या अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 आणि एलपीजी (पुरवठा आणि वितरणाचे नियमन) आदेश, २००० अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.म्हणून वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा वतीने दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन दिले जाणार आहे. सोबतच अकोला तालुका युवा आघाडी ठाणेदार आणि तहसीलदार यांना भेटून सदर घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करणार आहे. त्यामध्ये संबंधित गॅस एजन्सीची संपूर्ण वितरण प्रक्रिया तपासण्यात यावी.

दोषी अधिकारी व एजन्सी चालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. संबंधित एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
मृत व्यक्तीच्या कुटुंबास योग्य आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्यात यावा. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींवर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात यावी. अशी मागणी करणार आहेत.

एकंदर तपास यंत्रणा आणि पुरवठा विभाग मॅनेज झाल्या सारखा हे प्रlकरण हाताळत आहेत. वंचित बहुजन युवा आघाडी मात्र कुठल्याही प्रकारे हे प्रकरण मॅनेज होऊ देणार नाही असा इशारा वंचित युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

Tags: AccountabilityAdministrative FailureAkola gas agency incidentAkola newsGas AgencyGas DistributionHeatwave RiskInvestigationJustice For ShirsatLPG CrisisMaharashtra newsnegligencePublic safetyRural IssuesSystem Failure
Previous Post

कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

Next Post

अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही – अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; ‘वंचित’च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

Next Post
अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही - अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; 'वंचित'च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही - अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; 'वंचित'च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक
बातमी

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

by mosami kewat
March 31, 2026
0

अकोला : आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे घरगुती गॅस पुरवठ्यातील तुटवडा गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्जाबर गावमौजे येथे...

Read moreDetails
अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही - अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; 'वंचित'च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही – अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; ‘वंचित’च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!

March 31, 2026
माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस एजन्सीतील रांगेत दुर्दैवी मृत्यू; घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

March 31, 2026
कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

March 31, 2026
दर्यापुरात गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वितरणासंदर्भातील तणाव; वंचित बहुजन आघाडीने केली कारवाईची मागणी

दर्यापुरात गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वितरणासंदर्भातील तणाव; वंचित बहुजन आघाडीने केली कारवाईची मागणी

March 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home