Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
March 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

       

मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत जोरदार हल्ला चढवला आहे. “ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?” असा सवाल विचारत, ठाकरेंचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज, ज्यांचा महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि आमदारांना गुवाहाटीला नेण्यात मोठा हात होता, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. याच मुद्द्यावरून सुजात आंबेडकरांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Sujat Ambedkar Statement)

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे सत्तेत असताना ठाकरेंनी किती मराठी शाळा उघडल्या? किती मराठी कंत्राटदार किंवा उद्योजक घडवले? असा सवाल सुजात यांनी विचारला आहे. “यांच्या नाकर्तेपणामुळेच मराठी माणूस आज मुंबईबाहेर फेकला गेला आहे,” असा आरोपही त्यांनी केला. (Sujat Ambedkar Statement)

ठाकरे कुटुंबाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, बाळासाहेबांनी ज्यांच्या विरोधात ‘हटाव लुंगी’ची घोषणा दिली, त्याच दक्षिण भारतीय मतांसाठी आदित्य ठाकरे लुंगी घालून फिरत होते. जेव्हा गरज होती तेव्हा ‘केम छो वरली’ म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घातले. आता जेव्हा पक्ष अडचणीत (व्हेंटिलेटरवर) आहे, तेव्हा यांना पुन्हा मराठी अस्मिता आठवू लागली आहे. असे सुजात आंबेडकर म्हणाले. (Sujat Ambedkar Statement)

६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी सुद्धा मराठीच असतात. मात्र, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई सोडून बाहेर का जातात? तेव्हा तुमची मराठी अस्मिता कुठे जाते? असा बोचरा सवालही त्यांनी विचारला. (Sujat Ambedkar Statement)

जेव्हा जेव्हा यांचा पक्ष संकटात असतो, तेव्हा हे लोक मराठी माणसाचा वापर करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान राहा, असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.



       
Tags: Aditya ThackerayIdentity PoliticsIndia PoliticsMaharashtra politicsMarathiIssuesMnsMumbai politicsPolitical DebateRaj ThackerayShiv SenaSujat AmbedkarSujat Ambedkar StatementThackeray FamilyVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

Next Post

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

Next Post
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 
बातमी

धार्मिक स्वातंत्र्य विधेयक लोकशाहीसाठी घातक – अंजलीताई आंबेडकर 

by mosami kewat
March 30, 2026
0

खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे...

Read moreDetails
शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

शेअर बाजार: घसरणीच्या प्रवासात नजर हटी, दुर्घटना घटी !

March 30, 2026
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

March 30, 2026
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

March 30, 2026
अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

March 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home