Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

mosami kewat by mosami kewat
March 30, 2026
in बातमी
0
पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!

       

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यानंतर, आज दुपारी पुण्यात हवामानाने अचानक कूस बदलली. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे वाढत्या तापमानापासून पुणेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.

दुपारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने रस्ते निसरडे झाले असून दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक मंदावली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Rain)

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात आजपासून हवामानात मोठा बदल होणार होता. त्याप्रमाणेच पुण्यात पावसाने सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Pune Rain)

बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली उभे न राहणे आणि घराबाहेर पडताना पावसाळी साहित्याचा वापर करण्याचे सुचवले आहे.


       
Tags: MaharashtraMonsoonPune rainrain
Previous Post

अकोल्यात गॅस सिलेंडरच्या रांगेत माजी सरपंचांचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

Next Post
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
July 31, 2026
0

औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी अभियान राबविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

July 30, 2026
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

July 30, 2026
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home