Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

Akash Shelar by Akash Shelar
March 27, 2026
in Uncategorized, बातमी
0
शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी
       
गेवराई : जगदंब शिक्षक प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या कैलास बाबुराव उघडे माध्यमिक विद्यालय, उमापुर (सिरसदेवी) येथे कार्यरत असलेले सहशिक्षक कैलास बाबुराव उघडे यांनी 14 मार्च 2026 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पगार थांबवून आर्थिक कोंडी व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उघडे यांच्यावर बोरकर व श्रीराम शेळके यांनी पगार रोखून ठेवत मानसिक त्रास दिला होता. या संदर्भात त्यांनी संस्थेच्या सचिवांकडे तक्रार केली होती. मात्र, सचिवांनी जातीय दृष्टिकोनातून दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, यामुळेच आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात केवळ दोनच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात संस्थेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत अमरसिंह पंडित व जयसिंह पंडित यांच्यासह संबंधित सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

कैलास उघडे यांचा संघर्षमय प्रवासही समोर आला आहे. 2004 मध्ये त्यांनी शिवाजीराव पंडित कला महाविद्यालयात सेवा सुरू केली. त्यानंतर विविध ठिकाणी काम करत 2010 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून सहशिक्षक पदावर निवड झाली. मात्र, विनाअनुदानित स्थिती, अपुरा पगार आणि सततची आर्थिक अस्थिरता यामुळे त्यांना इतर ठिकाणीही काम करावे लागले होते.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मृताच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या निर्देशानुसार पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना दिलासा देत न्यायासाठी लढा उभारण्याचा इशारा दिला. यावेळी प्रशांत बोराडे, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, राजेशकुमार जोगदंड, किशोर भोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Tags: beedMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

Next Post

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  
article

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

by mosami kewat
October 1, 2026
0

- संजीव चांदोरकर  एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक...

Read moreDetails
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home