Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

mosami kewat by mosami kewat
March 27, 2026
in बातमी
0
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव
       
Todays Gold Rate : इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती, मात्र नंतर अचानक घसरणही पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर एकवेळ 1.28 लाख रुपयांपर्यंत खाली आले होते.

दरम्यान, 6 एप्रिलपर्यंत कोणताही हल्ला होणार नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर बाजारात काही प्रमाणात स्थिरता आली. यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी वरचा कल घेतला आहे. 27 मार्च 2026 रोजी एमसीएक्सवर सोन्याचा दर 1200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,40,780 रुपयांवर पोहोचला. चांदीतही अशीच तेजी दिसून आली असून तिचा दर प्रति किलो 2,24,120 रुपयांवर गेला. (Todays Gold Rate)

मागील दिवशी दर घसरले असले तरी आज पुन्हा तेजीचे चित्र आहे. 26 मार्चला जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्यासाठी सुमारे 1,47,290 रुपये मोजावे लागत होते, त्यानंतर पुन्हा वाढ नोंदवली गेली. काही दिवसांपूर्वी झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे दर आणखी कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र प्रत्यक्षात बाजाराने उलट दिशा घेतली.

युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारावर दबाव दिसून येत असताना, गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे विशेषतः सोने आणि चांदीकडे वळताना दिसतो आहे. त्यामुळेच या मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ-उतार सुरू आहेत. (Todays Gold Rate)

तज्ज्ञांच्या मते, जर येत्या काळात तणाव कमी झाला किंवा युद्ध थांबले, तर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मात्र बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम असल्याने दरांमध्ये अस्थिरता राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: goldPriseTodays Gold Rate
Previous Post

BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

Next Post

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

Next Post
धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home