Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
March 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी
       

नांदेड : वाजेगाव ईदगाह परिसरात घडलेल्या स्फोटाची माहिती मिळताच, वंचित बहुजन आघाडीचे नेते व नगरसेवक प्रशांत इंगोले तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद, नगरसेवक राहुल सोनसळे, आकाश जोंधळे, शुक्लोधन गायकवाड, वाजेगाव शाखेचे सत्तार, डॉ. भद्रे, तौफीक भाई यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

त्यावेळी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमची तपासणी व पोलिसांची कारवाई सुरू होती. तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने सर्वांना घटनास्थळी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. (Wazegaon Eidgah Blast in Nanded)

दरम्यान, नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद यांनी दोन वेळा दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली. त्यांच्या गैरहजेरीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सादर करण्यात आलेले विस्तृत निवेदन त्यांच्या राईटर एपीआय महादेव पुरी यांनी स्वीकारले. या निवेदनाद्वारे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून सत्य समोर येईल आणि जनतेचा विश्वास अबाधित राहील. (Wazegaon Eidgah Blast in Nanded)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आलेल्या या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

– मृत व्यक्तीचा फॉरेन्सिक पोस्टमार्टम करून टॉक्सिकोलॉजी अ‍ॅनालिसिस करण्यात यावा व त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.

– मृत व्यक्तीच्या डिजिटल प्रोफाइल व सोशल नेटवर्कची सखोल चौकशी करण्यात यावी.

– वापरण्यात आलेल्या explosive material ची संपूर्ण तपासणी करून त्याची supply chain शोधण्यात यावी.

– मृत व्यक्तीची मेंटल हेल्थ (मानसिक स्थिती) तसेच कोणत्याही प्रकारच्या instigation (उकसावा) बाबत चौकशी करण्यात यावी.

– संपूर्ण तपास प्रक्रिया पारदर्शक (transparent) पद्धतीने राबविण्यात यावी.

यासोबतच, फॉरेन्सिक तपास, सोशल नेटवर्कची चौकशी, वापरण्यात आलेल्या सामग्रीची supply chain आणि संपूर्ण घटनाक्रमाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही ठळकपणे करण्यात आली आहे. (Wazegaon Eidgah Blast in Nanded)

वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, चौकशीत होणारी कोणतीही दिरंगाई ही देखील प्रकरणात ढिलाई मानली जाईल. वाजेगाव प्रकरणातील सत्य समोर येणे अत्यंत आवश्यक असून, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सच्चाई दडपली जाणार नाही, याची खात्री प्रशासनाने द्यावी, असेही निवेदनात नमूद आहे. न्यायासाठीचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी व्यक्त केला आहे.


       
Tags: blastMaharashtranandedPoliticalVanchit Bahujan AghadiWazegaon Eidgah Blast in Nanded
Previous Post

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

Next Post

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

Next Post
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिल्लीला वेढा घालुया!
राजकीय

दिल्लीला वेढा घालुया!

by mosami kewat
March 24, 2026
0

- धनंजय कांबळे नागपूरच्या भूमीतून उठलेला आवाज हा केवळ एका मोर्चाचा गजर नाही, तर तो हुकुमशाही सत्तेच्या किल्ल्याला लावलेला सुरुंग...

Read moreDetails
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

March 24, 2026
वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

March 24, 2026
टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

March 24, 2026
आरएसएस मुख्यालयावर विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 

आरएसएस मुख्यालयावर विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home