Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा
       
कचनेर येथील जाहीर सभेत परिवर्तनाचा नारा; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा धडाका सुरू होता. आज पैठण तालुक्यातील कचनेर येथे आयोजित भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्तांतराचा स्पष्ट संदेश दिला. त्यांनी ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर बोलले. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पाणीपुरवठा यांसाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले.

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले, गावागावातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे, शिक्षणाची गुणवत्ता घसरली आहे आणि युवक बेरोजगारीने त्रस्त आहेत. या प्रश्नांवर फक्त आश्वासन नव्हे, तर ठोस कृती हवी आहे. वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणुकीसाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी उभी असलेली चळवळ आहे. (Sujat ambedkar)

ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही वंचित बहुजन आघाडीची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. तुमच्या परिसरातील स्थानिक समस्या जर खऱ्या अर्थाने सोडवायच्या असतील, तर यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या प्रस्थापित राजकारणाने सामान्य नागरिकांना फसवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व हवे असेल, तर वंचित बहुजन आघाडीला बळ द्यावे लागेल. (Sujat ambedkar)

सभेला पक्षाचे प्रवक्ते तय्यब जफर, युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, अक्षय देहाडे यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या जाहिर सभेत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. 

Tags: Aurangabad election resultsAurangabad newsMaharashtraPoliticalpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbafotindiaZilla parishad champingZp election
Previous Post

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

Next Post

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन
Uncategorized

पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन

by mosami kewat
February 5, 2026
0

पंढरपूर : राज्यातील तमाम वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू...

Read moreDetails
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

February 5, 2026
ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

February 5, 2026
प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

February 5, 2026
प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

February 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home