Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत? 

mosami kewat by mosami kewat
February 1, 2026
in बातमी, राजकीय
0
भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत? 
       
मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. असे असताना, भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रांत दिलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने दिलेल्या पूर्ण पान ‘श्रद्धांजली’ जाहिरातींमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, हा केवळ शोक नसून राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवण्याचा एक सुनियोजित ‘राजकीय डाव’ असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

आचारसंहिता आणि जाहिरातीचा पेच

निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर कडक निर्बंध असतात. मात्र, भाजपने ‘श्रद्धांजली’ या नावाखाली वृत्तपत्रांत भाजपच्या पक्ष चिन्हासह पूर्ण पान जाहिराती प्रसिद्ध केल्या. 

विशेष म्हणजे, ज्या दिवशी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, त्या दिवशी त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा स्वरूपाच्या मोठ्या जाहिराती दिल्या नव्हत्या. मात्र, भाजपने दाखवलेली ही ‘तत्परता’ अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जेव्हा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच दिवशी भाजपच्या या भावपूर्ण जाहिराती प्रसिद्ध झाल्या. एकीकडे दुःखद प्रसंग असताना भाजपने श्रद्धांजली जाहिरातीच्या आडून स्वतःचा प्रचार करण्याची संधी सोडली नाही. निवडणूक आयोगाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे देखील बोलले जात आहे.

Tags: Ajit PawarbjpCongressElectionMaharashtraNCPPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जयपूरमध्ये ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटमध्ये भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Next Post

हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post
हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 

हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब - ॲड. प्रकाश आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा
बातमी

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्र्यांना इशारा

by mosami kewat
June 6, 2026
0

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. मात्र, राज्यातील विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर शासन कर्जमाफीची फसवी...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

June 6, 2026
बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्य आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी

बीडमध्ये मातंग तरुणाच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीची पीडित कुटुंबाला भेट; अन्य आरोपींना सहआरोपी करण्याची मागणी

June 6, 2026
अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

June 5, 2026
धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

June 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home