मुंबई : अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनित्रा पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी करण्यात येत होती. (Maharashtra Deputy CM)
पक्षाकडून होत असलेल्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकरण्यास तयार झाल्या आहेत. अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आज राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड होणार आहे. सुनेत्रा पवार यांची त्या पदावर निवड होणार आहे.
अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी हालचाल
अजित पवार यांच्याकडे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खातं होतं. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबतं केली जात आहेत. (Maharashtra Deputy CM)
दरम्यान शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे की, या शपथविधी प्रकरणी मला काहीही माहिती नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला विधान आले आहे.






