मुंबई : वंचित बहुजन आघाडी गोवंडी वार्ड क्र. १३९ चे कार्यकर्ते जगन्नाथ सातदिवे यांची कन्या प्रज्ञा सातदिवे यांच्या मंगल परिणय सोहळ्यात २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण उपस्थितांना देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २५ नोव्हेंबर रोजी ही संविधान सम्मान महासभा पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या सभेला मार्गदर्शन करतील.
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महिला महासचिव शारदा गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते.






