Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जम्मू – काश्मीरमध्ये देशाचे ४ जवान शहीद; मोदी तुमची ५६ इंचाची छाती कुठे आहे ? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 22, 2023
in राजकीय
0
जम्मू – काश्मीरमध्ये देशाचे ४ जवान शहीद; मोदी तुमची ५६ इंचाची छाती कुठे आहे ? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल !
       
पुणे : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. 20 डिसेंबरपासून सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मोदी यांची ५६ इंचाची छाती कुठे आहे ? त्या छातीत काय फरसाण, ढोकळा, भजे भरले आहेत का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

५६ इंच छाती नाही तर, ही २४ इंची मागे पडलेली छाती आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

जम्मूमधील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळाल्यानंतर 20 डिसेंबरच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील थानामंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर गोळीबार केला.

या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी या हल्ल्यात देशाचे 4 जवान शहीद झाल्याचं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं. कारवाई सुरू असून पुढील माहिती काढली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनास्थळावरून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये लष्कराच्या दोन वाहनांच्या तुटलेल्या काचा दिसत आहेत.

Tags: narendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नारायण राणेंच्या आरोपावर ‘ वंचित’ चे थेट उत्तर !

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर – शरद पवार उद्या एका मंचावर ?

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर – शरद पवार उद्या एका मंचावर ?

ॲड. प्रकाश आंबेडकर - शरद पवार उद्या एका मंचावर ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन
बातमी

वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

by mosami kewat
January 23, 2026
0

मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या...

Read moreDetails
काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

January 22, 2026
एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

January 22, 2026
खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

January 22, 2026
महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

January 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home